आ.पडळकरांनी स्पष्ट केली भूमिका | मी नाराज असण्याचा प्रश्नच नाही
नागपूर : मंत्रीपद मिळावं ही कार्यकर्त्यांची भावना होती.मात्र पक्ष जी देईल ती जबाबदारी मी पार पाडत राहीन,मी नाराज नाही अशी स्पष्ट भूमिका जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
मी भाजपचा सर्वामासामान्य कार्यकर्ता आहे.मला जे सांगितले ते मी करतो.पार्टीनं जे दिलं ते मला मान्य आहे. आता मी धनगर समाजासाठी पूर्णपणे काम करणार आहे.धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी कार्यकर्त्यांच्या भावना होत्या,आता पक्षाने दिलेली जबाबदारी यापुढे पुर्ण क्षमतेने पार पाडणार आहे.मी देवाभाऊंच्या सोबत आहे.कार्यकर्त्यांनी याचं भान राखावं असेही पडळकर म्हणाले.
पहिल्यापासून मंत्रीपदाच्या चर्चेत असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.त्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली.
आ.पडळकर म्हणाले,माझ्या चेहऱ्यावरुन तुम्हाला मी नाराज आहे असे वाटते का? असा सवाल देखील पडळकरांनी केला. मी संत बाळू मामा यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. इथे आल्यावर मी पहिल्यांदा तुमच्याशी बोलतोय असे पडळकर म्हणाले.मला पक्षाने जे मला दिलं आहे, ते मान्य आहे.यापुढे पक्ष सांगेल ते करणार असल्याचेही गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.मंत्रीपदापासून वगळ्यात मारकडवाडीचं आंदोलन भोवल्याचा प्रश्न येत नाही असेही ते म्हणाले.मंत्रीपद जास्त महत्त्वाचा वाटत नाही,त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही असेही पडळकर म्हणाले.
ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यानं ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.छगन भुजबळ हे ओबीसीचे वरिष्ठ नेते आहेत, ज्यावेळी ओबीसी समाजाचा विषय आला, तेव्हा कोणतेही मातब्बर पुढे येत नव्हते पण भुजबळ हे पुढे आल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.ज्यांच्या सोबत माझी दुश्मनी आहे त्यांच्या सोबत माझी दुश्मनी कायम राहील असेही पडळकर म्हणाले.
पडळकर म्हणाले,छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे ओबीसी समाजात तीव्र संताप आहे.मात्र तो माझ्या पार्टीचा विषय नसल्याचे पडळकर म्हणाले.राम शिंदे यांना जे पद मिळणार आहे त्याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही पडळकर म्हणाले. मी जी भूमिका घेऊन काम करतोय ती भूमिका मी अजिबात बदलणार नाही.माझे तशाच पध्दतीने काम सुरू राहील.
विधीमंडळात नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागली तरीही मी माझ्या मतदार संघासाठी करणार असल्याचे पडळकर म्हणाले. देवाभाऊ आणि माझे वेगळे नाते आहे असेही पडळकर म्हणाले.
नागपूर येथे अधिवेशनासाठी जात असताना जतचे आमदार गोपीचंद पडळकर