सोमवती आमवश्येलाही जत यात्रेत भाविकांची तूफान गर्दी | यंदा इतक्या भाविकांनी घेतले दर्शन..

0
79

जत :सोमवती अमावस्येला  श्री.यल्लमादेवीच्या दर्शनाला लोटला  भक्तांचा महापूर,लाखो भाविकभक्तांनी आज देवीला नैवेद्य दाखवून गंध नेसून फेडला नवस.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी जागृत देवी श्री.यल्लमादेवीची यात्रा नुकतीच पार पडली.

देवीच्या किच कार्यक्रमानंतर बंद असलेला देवीचा दरवाजा सोमवारी रात्री बारानंतर उघडण्यात आला.त्यांनंतर देवीचे पुजारी श्री.सुभाष कोळी व श्री.स्वप्नील कोळी यांनी पहाटे देवीचा अभिषेक केला.त्यानंतर देवीची पूजा व आरतीनंतर देवीचे दर्शन सर्वांसाठी खुले झाले.

आज सोमवती अमावशा असल्याने सकाळपासूनच देवीचे दर्शनासाठी भाविकभक्तांची मोठी रांग दिसून येत होती.जत पंचक्रोशीतील भाविक जे यात्रा कालावधित देवीच्या दर्शनासाठी येऊ शकले नाहीत ते भाविक भक्त व महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

 आज सोमवती अमावस्या असल्याने देवीचे हजारो भाविकभक्त ज्यांनी आपल्या आरोग्यविषयक समस्या निवारण्याचे व देवीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी नवस केले होते ते सर्वजण आज श्री.यल्लमादेवीच्या मंदिरापासून पाचशे मिटर अंतरावर असलेल्या पुरूष व महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रीम स्नानकुंडात स्नान करून ओलेत्या अंगाने मंदिर परिसरात असलेल्या देवदासी व जोगतीनीकडून सर्वांगाला गंध लावून घेऊन तसेच कमरेला लिंबाचे डहाळे बांधून घेऊन तोंडात लिंबाची पाने धरून श्री.यल्लमादेवीच्या मंदिरासभोवती उदं ग आई उदो,यल्लू आईचा उदो चा जयघोष करित नवस फेडून देवीचे दर्शन घेत होते.

त्याचप्रमाणे आजही लाखो भाविक भक्तांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवीला.यावेळी अनेक भाविकांनी यात्रा परिसरातच तीन दगडाची चूल तयार करून त्यावर पुरणपोळीचा नैवेद्य बनविला व देवीला दाखविला.

  श्री.यल्लमादेवीची यात्रा समाप्तीनंतर आज परत मोठ्याप्रमाणात यात्रा भरलेचे दिसत होते.पंढरपूर येथील मेवामिठाई चे व्यवसाईक खंडागळे बंधू यांच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी दिसत होती.

यात्रेतील सर्वच गल्ल्या आज यात्रेकरूंनी भरून गेल्या होत्या.यात्रेत आकाशी पाळणे, मौत का कुवा,यासह लहानमोठे दोन डझनावर पाळणे आल्याने व ईतर अनेक मनोरंजनाची साधने आल्याने आज यात्रेकरूंनी त्याचा मनमुराद आनंद लुटला.

जत यात्रेत श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान व स्थानिक प्रशासन यांनी केलेले नियोजन नावापुरतेच होते.यात्रेत पाळणा व्यवसाईकांनी पोलीस प्रशासनाकडे सुरक्षेसाठी पैसै भरूनही पोलीसांनी त्यांना सुरक्षा न पुरवल्याने या पाळणे व्यवसाईकांना व त्यांच्या कामगारांना हुल्लडबाज गावगुंडाकडून बेदम मार खावा लागल्याने या यात्रेत हा चर्चेचा विषय झाला आहे.आजही पे पार्कींग च्या नावाखाली यात्रेत आलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या रस्त्यातच अडवून पे पार्कींग वाले त्यांना लुबाडताना दिसत होते.

 

यात्रेत आरोग्य विभागाचेवतीने तात्पुरते आरोग्य केंद्र उभारले असलेतरी त्या आरोग्य केंद्राचे समोर व चहुबाजूस मोठी गर्दी झाल्याने आरोग्य विभागाची असलेली रूग्णवाहीका कशी बाहेर निघणार असा सवाल यात्रेकरूंकडून केला जात होता.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here