जत : तुमच्यासाथीनं केलेल्या माझ्या प्रयत्नांना यश आलं. जो शब्द दिला तो पाळला! आता MIDC च्या माध्यमातून रोजगार, उद्योग निर्माण होणार आहे.हा गोपीचंदचा शब्द खाली पडणार नाही. जतच्या विकासासाठी मी कट्टीबद्ध आहे,असे उद्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले.
ज्या जतला जाणीवपूर्वक उपेक्षीत ठेवण्यात आलं तिथे विकासाची गंगा आणण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे शक्य होत आहे.जतच्या जनतेला उदयजी सामंत यांनी दिलेली साथही आम्ही विसरणार नाही.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कडून औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी जमीन घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून प्रस्ताव मागवले आहेत. हे ३० दिवसात सादर करायचे आहेत.
संबंधित तपशीलांसाठी व अर्जासाठी www.midcindia.org या संकेतस्थळाला भेट द्या किंवा rosangli@midcindia.org या ई-मेलवर संपर्क साधा.या सुवर्णसंधीचा फायदा घ्या.जतच्या औद्योगिक प्रगतीत योगदान द्या आणि विकासाचा भाग बना,असे आवाहनही आमदार पडळकर यांनी केले.