जत : जत येथील डॉ.निलेश आगतराव काळे हे वैद्यकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण असणारी एमडी ही पदवी परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष तथा धावडवाडी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आगतराव काळे यांचे डॉ.निलेश हे चिरजिंव आहे.मिरज शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पुर्ण केलेले डॉ.निलेश काळे यांचे प्राथमिक शिक्षण लांजा रत्नागिरी येथे तर पाचवी ते दहावीपर्यतचे शिक्षण जत येथील एसआरव्हीएम या शाळेत झाले आहे.
अकरावी-बारावी विलिंग्डन कॉलेज सांगलीत त्यांनी पुणे केले आहे.सध्या भूलतज्ञ म्हणून मुंबईतील नायर हॉस्पिटल येथे सध्या ते कार्यरत आहेत.नुकत्याच झालेल्या एमडी परिक्षेत त्यांनी यश मिळवत एमडी ही पदवी मिळवली आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.