कोल्हापूर : राज्यात कॉपी रोकण्यासाठी मोठी उपाय योजना करण्यात ये आहेत.या महिन्यात होत असलेल्या राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्याकडून अभ्यासाची तयारीही सुरू आहे.राज्य शासनाने यंदा या बोर्ड परीक्षेकडे अधिक लक्ष घात ले आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी आता केंद्र परिसरात तीसरा डोळा म्हणजे ड्रोन कँमेरे कार्यरत ठेवण्यात येणार आहेत.
राज्यातील काही संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांवेळी स्थानिक गुंडगिरी व स्थानिक यंत्रणांवर दबाव टाकून परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येतात. या कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
दहावी,बारावीच्या संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची Facial Recognition System व्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.त्यामुळे कॉपी करणाऱ्यावर मोठा अंकुश यावेळी राहणार आहे.