*जत : देवाची आराधना करीत असताना चित्त थार्यावर राहत नसेल तर त्या आराधनेचा काहिच उपयोग नाही. त्याचप्रमाणे अभ्यास करीत असताना त्या शब्दांचा अर्थ कळत नसेल तर त्या अभ्यासाचा काहीच उपयोग नाही. शब्दांच्या अर्था सोबत गट्टी झाली तरच आयुष्य सुंदर होते, अन्यथा आयुष्याचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही म्हणून प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घ्या असे प्रतिपादन लेखक कवी व संचार व लोकसत्ताचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शार्दुलसिंहराजे डफळे हे होते.प्राचार्य डॉ.सुरेश पाटील,प्रा.सुरेश बामणे, डॉ.शिवाजी कुलाळ, उपप्राचार्य प्रा.महादेव करेनव्वर, प्रा.सिद्राम चव्हाण उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी केलेल्या लिखित व मुद्रित शेला-पागोटा यांचे वाचन व सादरीकरण महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केले.प्रा.अनुप मुळे यांनी वरिष्ठ विभागाचा, प्रा.अभिजीत चव्हाण यांनी कनिष्ठ विभागाच्या क्रीडा अहवालाचे वाचन,यशाचा आढावा घेतला.
अहवाल वाचन डॉ.सतिशकुमार पडोळकर यांनी केले.विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी मिळवणारे डॉ.रामदास भोसले, डॉ.पुंडलीक चौधरी, डॉ.सोहम ठोंबरे,रसायनशास्त्रातील संशोधनाला पेटंट मिळाल्याबद्दल प्रो.डॉ.सुरेश पाटील,भौतिकशास्त्रातील पेटंट मिळाल्याबद्दल डॉ.सोहम ठोंबरे,गणित विषयांमध्ये सेट झाल्याबद्दल सौ.भाग्यश्री माळी,रसायनशास्त्रामध्ये सेट झाल्याबद्दल कु.स्मिता कोटी, विलिंग्डन कॉलेज, सांगलीच्या बीओएस मेंबरपदी निवड झाल्याबद्दल प्रा.नवनाथ लवटे,अखिल भारतीय महिला बॉक्सिंग टीमच्या कोच पदी निवड झाल्याबद्दल शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनुपम मुळे,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर अभय चषक क्रिकेट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रा.दीपक कांबळे यांची निवड झाल्याबद्दल, गुरुदेव कार्यकर्ते गटातून जिल्हा पातळीवर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल प्रा.रेश्मा लवटे,अखिल भारतीय पातळीवर एनसीसी मधून महिला तुकडीमध्ये राष्ट्रीय सेना परेडसाठी निवड झाल्याबद्दल कु.सुदीक्षा भोसले तसेच यशस्वी व गुणवंत खेळाडूचा सम्मान करण्यात आला.