डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे

0
27

  • सांगली : डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरणे आवश्यक आहे. इंटरनेट वापरताना सतर्क व जागरूक राहिल्यास इंटरनेटवरील फसवणूक आपण टाळू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
  • सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल, पोलीस हवालदार किरण परदेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, इंटरनेटवरील फसवणूक टाळण्यासाठी सायबर गुन्हे आणि हॅकिंग यासारख्या धोक्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढवावी.
  • इंटरनेटचा जबाबदारीने वापर करावा. नवनवीन तंत्रज्ञानाचा सकारात्मक पध्दतीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल यांनी सुरक्षित इंटरनेट दिनाविषयी सविस्तर माहिती दिली. पोलीस हवालदार किरण परदेशी यांनी इंटरनेट सुरक्षिततेबाबत माहिती दिली. 00000
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here