जिवनात अनेकदा आशेचे निराशेचे प्रसंग येत असतात.परंतू विचारांचा पाया भक्कम असलेली माणसं कुठल्याही प्रसंगात ठामपणे उभी राहतात.जिवनात कधीच निराश होऊ नका.आज प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची चिंता सतावत असते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाने नैराश्यावर मात करायला हवी.ताणतणाव ,सतत काळजी, चिडचिड करणे, दैनंदिन कामात अजिबात रस नसणं किंवा मुड नसणं हे डिप्रेशन होय.विचारांमध्ये सुसंगती न राहणं असे परीणाम दिसून येतात.
समोर आशेचे किरण अजिबात दिसत नाही. सगळ्याच गोष्टी ह्या आपल्या मनासारख्या होत नसतात.सतत दुःख कवटाळत बसण्यापेक्षा आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक विचार करा.चांगले विचार मनात बाळगा.
योग्य नियोजनातून ध्यैर्याने पुढे जायला हवे.अनेकदा यश आपल्या जवळ आलेले असते.मात्र आपण ध्यैर्य गमावून बसतो.चालताना वीचाराला व विचारामुळे चालण्यास गती मिळते.त्यासाठी जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर विचारांचा पाया भक्कम असला पाहिजे .
संतोष दत्तू शिंदे, मु.पो.काष्टी,ता.श्रीगोंदा
जिल्हा, अहिल्यानगर
मो.७७२१०४५८४५