जतचे शांताबाई आरळी बीएएमएस कॉलेज देशात दुसरे | मुंबईत गौरव | डॉ.रविंद्र आरळी यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य पुन्हा आधोरेखित

0
10

जत : भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आयुष डिपार्टमेंट भारत सरकार यांच्या देश का प्रकृती परीक्षण या अभियानामध्ये शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॉलेज जत यांनी संपूर्ण देशामधून दुसरा क्रमांक पटकविला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आयुष डिपार्टमेंट भारत सरकार यांच्या मदतीने संपूर्ण भारत व भारतातील सर्व लोकांची प्रकृती परीक्षण या अभियानासाठी भारतातील सर्व आयुर्वेदिक कॉलेज यांना आव्हान करण्यात आले होते.या आव्हानाला अनुसरून देश का प्रकृती परीक्षण या अभियानामध्ये जवळ पास देशातील ८०० पेक्षा जास्त देशातील कॉलेजनी सहभाग नोंदविला होता.

यात जत सारख्या दुर्गम भागातील नुकतेच चालू झालेले शांताबाई शिवशंकर आरळी बीएएमएस कॉलेजने देश का प्रकृती अभियानामध्ये पूर्ण सहभाग घेतला होता.७५ हजाराच्या वर लोकांची प्रकृती प्रशिक्षण केले आहे.या सर्वाचे दखल घेत या अभियानात देशात दुसरा क्रमांकांसाठी निवड करण्यात आली आहे.कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ.प्रदीप भोसले, डॉ.योगेश जिरंअंकलीकर, डॉ.धनंजय खोत या सर्वांनी शंभर टक्के योगदान दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून भारतातील प्रकृती कशी असेल आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट आयुर्वेदिक पध्दतीने देता येईल हा एक अत्यंत उपकृत असा कार्यक्रम त्यांनी राबिविला आहे.नुकत्याच मुंबई मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात संपूर्ण देशातून शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॉलेज जत यांनी दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल केंद्रिय आरोग्य मंत्री ना.प्रतापराव जाधव आणि राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते गौरविण्यात आले.

दुष्काळी जत तालुक्यात प्रथमच आम्ही बीएएमएस कॉलेज सुरू केले आहे.आमच्या कॉलेजचे सर्व डॉक्टर्स,कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापुर्ण कामामुळे हे यश मिळाले आहे.यापुढेही नवनविन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

According to your website, you have recently opened a new BAMS college in the drought-affected Jat taluka. This achievement is due to the quality work of your college’s doctors, staff, and students. You plan to continue implementing new initiatives in the future.

– डॉ.रविंद्र आरळी,संस्थापक, आरळी हॉस्पिटल ग्रुप

जत : येथील शांताबाई शिवशंकर आरळी बीएएमएस कॉलेजला देशातून दुसऱ्या क्रंमाकांने गौरविण्यात आले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here