जत : जत शहरातील प्रभाग क्र.७ मोरे काॅलनी येथिल नागरिक अनेक नागरी सुविधापासून वंचीत, सुविधा न पुरविणाऱ्या नगरपरिषदेविषयी रहिवाशांकडून तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.शहरातील प्रभाग क्रमांक ७ या प्रभागातील नागरी समस्यांकडे जत नगरपरीषदेचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे.गेली तीस वर्षे झाली या प्रभागातील रस्त्यांचे व गटारीचे काम झाले नाही.तसेच या प्रभागातील जे काही नैसर्गिक नाले आहेत जे नाले हिंदू स्मशानभूमीकडे असलेल्या बनाल्याला जाऊन मिळतात. ते सर्व नैसर्गिक नाले येथील जमिन मालकांनी प्लाॅट पाडताना मुजविले असल्याने व नैसर्गिक नाल्यावरच प्लाॅट पाडून अनेकांनी आपली घरे बांधली आहेत.या परिसरात पक्क्या स्वरूपाचे रस्ते व सार्वजनिक गटारी नसल्याने रस्त्यावर व रस्त्याचे कडेला काटेरी वनस्पती उगवून आल्या आहेत.त्याचा त्रास येथिल नागरिकांना सहन करावा लागत आहे.
येथील सर्वच नैसर्गिक नाले मुजविले गेल्याने या परिसरात ठिकठिकाणी गटारींचे पाणी साचून राहीले आहे.हे पाणी वाहून जाण्यासाठी नगरपरिषदेने कोणतीही उपाययोजना न केल्याने या गटारीच्या साचून राहिलेल्या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डासांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.येथिल रहिवाशांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे.
येथील रहीवाशांनी अनेकवेळा जत नगरपरीषदेकडील अधिकाऱ्यांना येथिल रस्ते,गटारी व जागोजागी साचलेली घाण व दुर्गंधीयुक्त पाण्याची डबकी याबाबत सांगूनही त्यांच्याकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.
जत नगरपरिषदेच्या या जाणीवपूर्वक होत असलेल्या दुर्लक्षामुळे येथील रहिवाशांना जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागत असून येथील रहिवाशांकडून नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे असून अडचण व नसून खोळंबा असे असल्याने त्यांचे जत शहरातील नागरी समस्येकडे अजीबात लक्ष नाही,असा ग्रामस्थांतून आरोप होत आहे.
जत नगरपरिषदेत ते फार कमीवेळ असतात त्यामूळे शहरातील नागरी समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याने शहरातील मोरे काॅलनी,समर्थ काॅलनी,देवकते काॅलनी व सोनाई मंगल कार्यालय पाठीमागील परीसर विविध नागरिसमस्येने ग्रासला आहे.लवकरात लवकर जत नगरपरिषदेने येथिल नागरिसमस्यांकडे लक्ष दिले नाहीतर येथील रहिवाशांनी नगरपरिषदे विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जत शहरातील मोरे कॉलनीतील रस्त्याची दुरावस्था झाली आहे.