जत: जत तालुक्याच्या विकासासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीस उपस्थित राहिलो.या बैठकीत खा.विशालदादा पाटील यांनी विविध प्रकल्प,पायाभूत सुविधा आणि योजनांवर सविस्तर चर्चा केली. विशेषत: म्हैशाळ योजनेच्या पूर्णत्वासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. तालुक्यातील शेतीला पूरक जलसंधारण आणि सिंचन प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.माजी आमदार विक्रमसिंह सावंत,प्रकाश जमदाडे,नाना शिंदे,बाबासाहेब कोडग आदी मान्यवर उपस्थित होते.
खा.पाटील म्हणाले, गेल्या काही काळात अंमली पदार्थाचा गैरवापर तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे, ही चिंतेची बाब आहे. यामुळे तरुण पिढीचे आरोग्य आणि भविष्य सुरक्षित राहावे यासाठी पोलीस प्रशासनाने काटेकोरपणे कारवाई केली पाहिजे. नागरी सुविधांचा विकास, रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था आणि रोजगारनिर्मिती यासंबंधी सविस्तर संवाद यावेळी झाला. उद्योग आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून तालुक्यातील युवकांना सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्प आणणेच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.
जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबींवर धोरणात्मक चर्चा करण्याच्या दृष्टीने आयोजित आढावा बैठकी प्रसंगी शासकीय अधिकारी, पदाधिकारी तथा नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी पायाभूत सुविधा, विविध क्षेत्रांतील प्रकल्प आणि योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीप्रसंगी जनतेच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत निवेदने स्विकारली, तसेच तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. नागरी सुविधांचे अधिक मजबुतीकरण, शेती व उद्योग विकास, युवकांना रोजगाराच्या संधी आणि तालुक्याच्या समृद्धीसाठी राबवायच्या नव्या उपक्रमांवर सकारात्मक चर्चा झाली.तालुक्याच्या विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. जनतेच्या विश्वासाला कायम ठेवून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची ग्वाही दिली,यावेळी खा.पाटील यांनी दिली.
जत येथील आढावा बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेताना खा.विशाल पाटील