जत : हिवरे (ता. जत) येथे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टररखाली सापडून संतोष शिवाजी माने (वय ३१) याचा मृत्यू झाला.
या अपघातप्रकरणी ट्रॅक्टर चालक बाळासो शिंदे (वय ५८, रा. हिवरे) विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शिवाजी ज्ञानु माने (वय ५७, रा. हिवरे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ जुलै रोजी दुपारी हिवरे-अंकले रस्त्यावर संतोष माने हा ट्रॅक्टरचालक बाळासो शिंदे यांच्यासोबत महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एम. एच. १० ई. ए. ०९३८) व ट्रॉली (क्र. एम.एच. १० बी. क्यू ५३२१) मध्ये खडी आणण्यासाठी गेला होता. परत येताना हिवरे गावाच्या हद्दीतील उतारावर ट्रॅक्टरचे चाक दगडावर चढल्याने ट्रॅक्टर जोरात आदळला.




