जत : जत तालुका क्षेत्रातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखाच्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के वसुली केलेल्या विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन,सचिव तसेच फिल्ड ऑफिसर यांचा सन्मान सोहळा आज मंगळवार रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी दिली.
जमदाडे पुढे म्हणाले,तालुक्यातील बँकेच्या शाखा कार्यक्षेत्रातील विकास सोसायट्याच्या वसुलीसाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत.थकित कर्जामुळे व्यवहार थांबलेल्या अनेक संस्था आम्ही पुर्व पदावर आणत शेतकऱ्यांना चांगले कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न केला आहे.सातत्याने बँकेच्या हिताचे काम करत संस्थाचे पदाधिकारी, सचिव व फिल्ड ऑफिसर हे योगदान देत आहेत.त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा,त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही वसुलीसाठी १०० टक्के प्रयत्न केलेल्या विकास संस्थाचे चेअरमन,व्हा.चेअरमनसह सचिव व फिल्ड ऑफिसर यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.
आज मंगळवार ता.२२ जूलै रोजी राज डेकोरेटर्स अँण्ड इव्हेंट मँनेजमेंट हॉल राजाराम नगर छत्रीबाग रोड जत येथे सायकांळी ५ वाजता बँकेचे चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा संपन्न होणार असल्याचेही जमदाडे यांनी सांगितले.




