पालकमंत्री चंद्रकांतदादांना निवेदनजत : आशा व गटप्रवर्तक यांना शासनाकडून ज्या आशा व गटप्रवर्तक यांचे ६० वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना काढून टाकण्यात यावे याबाबतचे पत्र संबंधित विभागांना आले आहे.याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे कि,कोरोना सारख्या जीवघेण्या लाटेत आशाची कामगिरीची झलक देशात पोहचली आहे,अशा आशाना एकतर्पी काढून टाकून शासन अन्याय करत आहे.
आशाचे एकतर ६५ वर्ष सेवावृत्तीचे असावे, किंवा त्यांना सेवानिवृत्तीनंतर फंड व पेन्शन मिळावी, अशी मागणी करण्यात आली.पालकमंत्री पाटील यांनी याबाबत कॅबिनेट बैठकीत या विषयावर चर्चा करू असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले.येळवी, उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील गटप्रवर्तक व आशा उपस्थित होत्या.




