संख : संख ता.जत येथे दुचाकी व कुझर जिपचा समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला. आबांण्णा चंद्रकांत शेट्यापगोळ (पुजारी )वय ५० रा. बोऱ्याळ वस्ती संख,असे ठार झालेल्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की संख येथील मयत आबांना चंद्रकांत शेट्यापगोळ हे सायंकाळी ५:३० वाजता गावातून आठवडा बाजार करून दुचाकी एमएच -10,ईएम 2555 वरून घराकडे जात असताना पादगटी जवळ समोरून येणारी कर्नाटक पासिंग असलेली कुझर जिप KA 23 -N 2118 समोरासमोर भीषण धडक झाली.यात दुचाकी स्वार जागीच ठार झाला.
घटनास्थळी उमदी पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक एस.जाधव, पोलीस कॉन्स्टेबल घुमरे,पोलीस कॉन्स्टेबल संजय पांढरे,यांनी घटनास्थळ मधून मयत उतरीसाठी जत येथे पाठवण्यात आले. रात्री उशीरार्पयत दाखल करायचं काम चालू होते. पाच्यात पत्नी, दोन मुले शेतात राहतात.




