अडीच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त
संख : जत तालुक्यातील भिवर्गी येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर उमदी पोलिसांनी धाड टाकली.याप्रकरणी सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोटरसायकल मोबाईल असा एकूण दोन लाख पन्नास हजार तीनशे वीस रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.ही घटना मंगळवारी दि ५ रोजी दुपारी दोन वाजता कार्यवाही केली.पुर्व भागातील भिवर्गी येथे तीन पानी जुगार अड्डयाची माहिती मिळाली होती.जुगार खेळताना अड्ड्यावर राजकुमार यमनआप्पा कांबळे (वय ४८) बाबासो चंद्राम कांबळे (वय ५४) कुमार अण्णाप्पा कांबळे (वय ३८) मऱ्याप्पा आप्पासो वालीकर (वय ३६) विजय बसाना सुसलाद (वय ४१) सिद्ध इराप्पा वाघोली (वय ३८) सुनील आप्पासाहेब वालेकर (वय ३३ रा सर्व भिवर्गी) पोलीसांना मिळून आले.चंद्रकांत परसाप्पा कांबळे यांचे घराच्या पूर्वेस आडोशाला मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरु होता.
जुगार अड्ड्यावर रोख रक्कम १३२० रुपये, जुगाराचे साहित्य, मोटरसायकल मोबाईल असा एकूण दोन लाख पन्नास हजार तीनशे वीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.फिर्यादी पोलीस शिपाई मनीष जनार्दन कुंबरे यांनी दिली.आरोपीवर गुरंन व कलम-223/2025 महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास सहाय्यक फौजदार लक्ष्मण बंडगर करीत आहेत.



