म्हैसूर (कर्नाटक):
म्हैसूर जिल्ह्यातील भेर्या गावातील एका लॉजवर २० वर्षीय विवाहित तरुणीची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या तिच्याच बॉयफ्रेंड सिद्धराजूने केली असून, त्याने तरुणीच्या तोंडात स्फोटके भरून ट्रिगरने उडवून दिले.
मृत तरुणीचे नाव रक्षिता असून ती हंसुर तालुक्यातील गेरासनहल्ली गावची रहिवासी आहे. तिचे लग्न केरळमधील एका मजुरासोबत झाले होते, मात्र तिचे नात्यातील सिद्धराजूसोबत अनैतिक संबंध होते.
लॉजवर दोघांमध्ये झालेल्या कडाक्याच्या वादातून रागाच्या भरात सिद्धराजूने हा क्रूर हत्याकांड घडवून आणला. घटनेनंतर आरोपीने लोकांना दिशाभूल करण्यासाठी “मोबाईल फोनच्या स्फोटामुळे मृत्यू झाला” असा दावा केला. मात्र सत्य बाहेर आल्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता रक्षिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तिच्या चेहऱ्याचा खालचा भाग पूर्णतः उडाला होता. या घटनेने म्हैसूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली असून पोलिस तपास सुरू आहे.



