जत : जत मतदारसंघात विकासाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून तसेच जिल्हा नियोजन निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ आज सोमवार (दि.८ सप्टेंबर २०२५) रोजी होणार आहे.सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या या शुभारंभ सोहळ्यात तब्बल नऊ ठिकाणी कोट्यवधी रुपयांची कामे होणार आहेत. या कामांमुळे रस्ते, सभामंडप, अंगणवाडी केंद्रे अशा अत्यावश्यक सुविधा उभारल्या जाणार असून ग्रामविकासाला नवे बळ मिळणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता डोर्ली येथे डोर्ली-हिवरे रस्त्याच्या डांबरीकरणापासून होणार असून यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. सकाळी ९.३० वाजता बाज येथे अशोक चौकाजवळ १० लाख रुपयांचा सभामंडप उभारला जाणार आहे. अंकले येथे लक्ष्मी मंदिरासमोर सकाळी १० वाजता सभामंडप कामाचा शुभारंभ होईल (१० लाख). डफळापूर येथे अंगणवाडी केंद्र क्रमांक ६७ साठी १७ लाख खर्चून इमारत उभारली जाणार असून याचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
यानंतर खलाटी येथे सकाळी ११ वाजता सुनील संकपाळ घर ते मताबाई कांबळे घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण (५ लाख) केले जाणार आहे.बिळूर येथे कैकाडी समाज बसवेश्वर मंदिरासमोर सभामंडप (१० लाख) सकाळी ११.३० वाजता उद्घाटित होईल. दुपारी १२ वाजता वज्रवाड येथे गावांअतर्गंत रस्त्याचे काँक्रीटीकरण (१० लाख) करण्यात येणार आहे. उमराणी येथे दुपारी १२.३० वाजता अंगणवाडी केंद्र क्रमांक १८७ साठी १७ लाख खर्चून इमारत उभारली जाईल. तर दुपारी १ वाजता उमराणी येथे श्री मुरसिध्देश्वर मंदिरासमोर २५ लाख रुपयांचा भव्य सभामंडप उभारण्यात येणार आहे.
या सर्व कामांमुळे ग्रामीण भागातील सुविधा अधिक सक्षम होणार असून शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना नवे व्यासपीठ मिळणार आहे. आमदार पडळकर यांनी मतदारसंघातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार विकासकामांना प्राधान्य देत सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे.
एकूण कामांचा खर्च : सुमारे १ कोटी २४ लाख रुपये असून याचा लाभ शेकडो ग्रामस्थांना होणार आहे. या उपक्रमामुळे जत तालुक्यात विकासाची नवी पहाट उगवली असल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
पडळकर फोटो वापरा




