बसचा ठावठिकाणा मिळणार आता मोबाईलवर | प्रवाशांसाठी आणली नवी सुविधा !

0
303

मुंबई : एसटीची वाट थांब्यावर ताटकळत पाहण्याची गरज आता संपणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी ‘आपली एसटी’ नावाचे नवीन मोबाईल ॲप लाँच केले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या ॲपचे लोकार्पण झाले.

या ॲपमध्ये १२ हजारांहून अधिक बसेस आणि १ लाख मार्गांचे मॅपिंग करण्यात आले असून, प्रवाशांना बस केव्हा आणि कुठे येणार याची रिअल-टाईम माहिती मिळणार आहे. तसेच, जवळच्या बसस्थानकाची माहिती, बसचे वेळापत्रक, आरक्षित तिकीटाच्या बसचा लाईव्ह ट्रॅकिंग, आपत्कालीन क्रमांकांची सोय अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

सरनाईक यांनी सांगितले की, प्रवाशांचा अभिप्राय घेऊन ॲपमध्ये सुधारणा केली जाणार असून, लवकरच तिकीट बुकिंग ॲपमध्येही बसचा लाईव्ह डेटा जोडला जाईल. सध्या हे ॲप ‘MSRTC Commuter App’ या नावाने प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, मात्र लवकरच ते ‘आपली एसटी’ या नावाने दिसणार आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here