जतच्या माजी नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर यांचा भाजपात प्रवेश

0
8
filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 0; hdrForward: 0; shaking: 0.023920; highlight: 1; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 8; brp_del_th: 0.0003,0.0000; brp_del_sen: 0.1000,0.0000; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 256.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 41;zeissColor: bright;

विकासकामे गतीने व्हावीत म्हणून निर्णय — आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश

जत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जतच्या माजी नगराध्यक्षा सौ.शुंभागी बन्नेनवर आणि त्यांचे पती अशोक बन्नेनवर यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

“विकासकामे गतीने व्हावीत आणि जत शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर सत्ताधारी पक्षासोबत असणे गरजेचे आहे,” या विचाराने त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रवेशावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अशोक बन्नेनवर, शुंभागी बन्नेनवर यांचा शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.रवींद्र आरळी, चंद्रशेखर गोब्बी, सुभाष गोब्बी, शहराध्यक्ष आण्णा भिसे, सरदार पाटील, माजी नगरसेवक परशुराम मोरे, विक्रम ताड, सौ.ज्योतीताई घाडगे, गौतम ऐवळे, किरण मामा शिंदे, पापा कुंभार, संतोष मोटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रवेशामुळे जतमधील आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपला नवी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here