“जतमध्ये घड्याळचा गेम ON !” | “जतमध्ये घड्याळचा गेम ON !” | जतमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट,राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत उमेदवार यादी जाहीर 🔥नगराध्यक्षपदासाठी ‘कुटुंब प्रमुख’ मैदानात!👉 संपूर्ण यादी वाचण्यासाठी क्लिक करा…

0
127

जत : जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट घडवत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), बसपा व शिवसेना (उद्धव ठाकरे) आघाडीकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. शिक्षित, पदवीधर व तरुण नेतृत्वाला संधी देत जाहीर झालेली ही यादी सध्या जतच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना माजी आ. विलासराव जगताप म्हणाले,“गोरगरिब महिलांना लाडकी बहीण योजना देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजारो कुटुंबांना आधार दिला आहे. तसेच जत शहराच्या विकासासाठी मोठे निधी सहाय्य राज्य सरकारकडून येणार आहे. त्यामुळे जतकरांनी ‘घड्याळ’ चिन्हाला पसंती देऊन विकासाची गती कायम ठेवावी.”


🏛️ नगराध्यक्ष पदासाठी ‘कुटुंब प्रमुख’ मैदानात

जत शहराचे ज्येष्ठ नेते व “शहराचे कुटुंब प्रमुख” म्हणून ओळख मिळवलेले सुरेशराव बाबुराव शिंदे यांना राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी दिली आहे. शहरातील विकास, सामाजिक कामे आणि ३५ वर्षांची मजबूत पकड या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांचा विजय ‘निश्चित’ असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.


📍 राष्ट्रवादी आघाडीची संपूर्ण उमेदवार यादी

प्रभाग १ : योगेश हरी कांबळे, मेघा संतोष देवकर
प्रभाग २ : शरणाप्पा तम्माना आक्की, गौरी प्रशांत पाटील
प्रभाग ३ : हेमा शरद चव्हाण, सागर अण्णासाहेब चंपान्नावर
प्रभाग ४ : (बसपा चिन्ह) संतोष रमेश साबळे, तसमिन जिलानी जमादार
प्रभाग ५ : इमरान इकबाल गवंडी, सारिका योगेश ऐडके
प्रभाग ६ : शारदा अरुण कणसे, सचिन सुरेश मदने
प्रभाग ७ : स्वप्नील सुरेशराव शिंदे, अर्चना बाजी केंगार
प्रभाग ८ : प्रा. हेमंत चौगुले, सुवर्णा दीपक पाटणकर
प्रभाग ९ : रेश्मा शाहनवाज नदाफ, लक्ष्मण नामदेव ऐडके
प्रभाग १० : मोहिद्दीन मोहसद इनामदार, सुवर्णा बाळासो बामणे
प्रभाग ११ : प्रजक्ता अभिजित शिंदे, मीनाक्षी शरणाप्पा अक्की, संग्राम प्रमोद जगताप


💬 जतकरांना ‘कुटुंब प्रमुखच हवेत?’

शहराच्या सुख–दुःखात सोबत राहणारे, घराघरात परिचित आणि नेहमी उपलब्ध राहिलेले नेते म्हणून सुरेशराव शिंदे यांची ओळख आहे. शहरात राजकीय समीकरण बदलले तरी “जितके सरकार तितके जत” अशी त्यांची प्रतिमा असल्याने खुल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणानंतर जतकरांनी त्यांनाच पसंती दिल्याची चर्चा आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here