दरिबडचीतील दुकाने,कार्डधारकांची तपासणी | धान्य दुकानदार आंनदराव पाटीलला अटक ; दोन्ही दुकाने सील

0
2



दरिबडची,वार्ताहर : दरिबडची ता.जत येथे स्वस्तधान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात नेहणाऱ्या धान्य दुकानदाराचा नागरिकांनी पर्दापाश केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाकडून गावातील संबधित दोन्ही स्वस्तधान्य दुकाने सील करत,रेशनकार्ड धारकाची तपासणी व जबाब घेण्यात येत आहेत.









दरिबडची येथील धान्य दुकानदार आंनदराव पाटील हा धान्य दुकानातील गहू,तांदुळ हे धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी टाटा सफारी गाडीतून नेहत असताना नागरिकांनी पकडत गाडीसह धान्य महसूल विभागाच्या ताब्यात दिले होते.अनेक दिवसापासून गरीबाच्या तोंडातून धान्य काढून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या 

धान्यदुकानदार आंनदराव पाटील यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कार्ड धारकांनी धान्ये व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.









त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करणारे महसूल विभागाने गंभीर होत गावातील दोन्ही दुकाने सील करत रेशनकार्ड धारकांची तपासणी,जबाब घेण्यात येत आहे.त्यानंतर काळ्या बाजारातील धान्यबाबत व पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.स्वस्तधान्य दुकानाबाबत बेफीकीर असणारे संख अप्पर तहसीलचे अप्पर तहसीलदार, मंडल अधिकारी,तलाठ्याचे एक पथक दरिबडचीत ठाण मांडून कार्ड धारकाचे जबाब घेत आहे.मात्र कन्नड भाषिक व अज्ञान नागरिकांकडून अपेक्षित माहिती पथकाकडून एकत्रित करत दुकानदारावर काय कारवाई होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.










आंनदराव पाटीलाला अटक


स्वस्तधान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेहणारा व स्वस्तधान्य दुकानदार आंनदराव पाटील याला अखेर सोमवारी सायकांळी जत पोलीसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात उभे केले जाणार आहे.










निपक्ष तपासणी करा ; अमोगसिध्द शेंडगे



दरिबडचीतील दोन्ही स्वस्तधान्य दुकानातून कार्डधारकांना धान्याचे वाटप न करता अनेक महिन्यापासून लुट करण्यात आली आहे.आतापर्यत धान्याचे कागदपत्री वाटप झाल्याचे दाखवत शेकडो पोती धान्य काळ्या बाजारात विकले आहे.या सर्व प्रकारची निपक्ष व वस्तुनिष्ठ तपासणी करून कारवाई करावी,अशी मागणी ग्रा.पं.सदस्य अमोगसिध्द शेंडगे यांनी केली आहे.









दरिबडची ता.जत येथे रेशनकार्ड धारकांची तपासणी करणारे पथक

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here