जतेत कॉग्रेसचे धरणे आंदोलन

0
5



जत,प्रतिनिधी : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी मंजूर करुन घेतलेले कायदे रद्द करावेत तसेच हाथरस येथील घटनेतील पिडीतांच्या नातेवाईकांना भेटायला गेलेले काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला़.




केंद्र सरकारने मंजूर करुन घेतलेले शेतकरी विरोधी कायदे त्वरित रद्द करावेत़, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची सक्ती करावी़, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कायदेशीर संरक्षण देवून त्या अस्तित्वात राहण्याची हमी द्यावी, अशा विविध मागण्या यादरम्यान करण्यात आल्या.




यावेळी तालुकाध्यक्ष अप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबाहेब कोडग,जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे,पं स.सदस्य रविंद्र सावंत,पं स.दिग्विजय चव्हाण,मार्केट कमिटी संचालक अभिजित चव्हाण,सांगली जिल्हा काॅग्रेस ओबीसी अध्यक्ष तुकाराम माळी सर,माजी नगरसेवक महादेव कोळी,नगरसेवक नामदेव काळे,विक्रम फाऊंडेशन अध्यक्ष युवराज बाळ निकम,माजी ग्रा.प.सदस्य सलीम पाच्छापूरे,माजी नगरसेवक निलेश बामणे,माजी नगरसेवक मुन्ना पखाली,अतुल मोरे,




 जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस रमेश कोळेकर,जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने,एनएसयुआयचे तालुका अध्यक्ष बाळू बामणे,उपाध्यक्ष गणी मुल्ला,जत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे,फिरोज नदाफ,बाळासाहेब तंगडी,अप्पू माळी,प्रदीप नागणे,युवक काँग्रेस सरचिटणीस पपु कोडग,मिथुन माने,अमर माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here