आंवढी,वार्ताहर : अखिल भारतीय संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा आंवढीचे संरपच आण्णासाहेब जगन्नाथ कोडग यांना आधार महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
पुणे येथील नामाकिंत संस्था आधार सोशल संस्थेच्या वतीने उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या समाज सेवकांना हा पुरस्कार देऊन गौवरिण्यात येते.यंदाचा हा पुरस्कार आंवढीचे कृत्ववान,कर्तव्यदक्ष संरपच आणासाहेब कोडग यांना देण्यात आला आहे.
जत तालुक्यातील सीमावर्ती आंवढीसारख्या गावात उल्लेखनीय कार्य करत कोडग यांनी संरपच कसा आसावा यांचे उत्तम उदाहरण समाजापुढे उभे केले आहे.आंवढीचे युवा संरपच ते अखिल भारतीय संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष असा प्रवासात कोडग यांची कामगिरी आदर्श ठरावी अशी आहे.गावात केलेल्या पाणी फांऊडेशनच्या कामाचा गौरव राज्य पातळीवर नेहण्याची त्यांनी किमया साधली होती. त्यांची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंवढीला भेट देत गौरव केला होता.
त्याशिवाय जिल्ह्यात आदर्श ठरलेली गावात दारूबंदी करून त्यांनी आपले जनहिताचे काम स्पष्ट केले आहे.त्याशिवाय गावातील पाणी योजना,विविध विकास कामातून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्या लोकांनी निवडून दिले आहे,त्यांचे उत्तरदायित्व म्हणून लोकांच्या हितासाठी प्रशासन चालविणे,त्यांच्यासाठी कायम उपलब्ध राहणे अशा कामातून त्यांनी आंवढीचा लौकिक जिल्हाभर पोहचवला आहे.त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांची निवड केली आहे.
आंवढी : आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रमाणपत्रसह संरपच आण्णासाहेब कोडग, उपसंरपच आण्णासाहेब बाबर आदी