जत,प्रतिनिधी : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या 27 फेंब्रुवारी 17 च्या शासन निर्णयानुसार ऑनलाइन करण्यात यावेत,असा आदेश
आहेत. पण 15 फेंब्रुवारी 20 रोजी शासनाने परिपत्रक काढून शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन करव्यात असे सांगितले आहे.मात्र शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन कोणत्या पद्धतीने करणार याबाबत शिक्षकांच्या मध्ये तसेच शिक्षण विभागामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.बदल्या संदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या कमिटीचा निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही.तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कोविडची संख्या वाढत आहे.त्यामुळे शासनाने यावर्षीच्या जिल्हांतर्गत बदल्या रद्द कराव्यात.अशी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना निवेदन देऊन केली आहे.
याबाबत जिल्हा परिषद सांगली,यांनीही ठराव करून शासनाकडे बदल्या रद्द करणेबाबत पाठविला आहे.
यावेळी मी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन बदल्या रद्द करण्यासंदर्भात विनंती करतो,असे आश्वासन उपस्थित शिष्ठमंडळास आ.सांवत यांनी दिले.
यावेळी शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत, बाळासाहेब सोलनकर,मल्लय्या नांदगाव, नवनाथ संकपाळ ,विनोद कांबळे, इब्राहिम शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रद्द करा या मागणीचे निवेदन शिक्षक भारतीच्या वतीने आमदार विक्रमसिंह सांवत यांना देण्यात आले.