मैत्री दिन

0
0

शीतांशु कुमार सहाय का अमृत SHEETANSHU KUMAR ...

संकटकाळी जो कामी येतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. ज्याच्याजवळ मनमोकळे करताना कसलीच भीती,संकोच वाटत नाही, आपले गुपित ज्याच्या जवळ कायम जपले जाण्याची खात्री असते ती खरी मैत्री. आपले गुण दोष स्वच्छ आरशा सारखे स्पष्ट दाखवून आपल्या बाजूने ठामपणे उभी राहते ती खरी मैत्री.1958 पासून जागतिक मैत्री दिन साजरा होऊ लागलाय. आपल्या देशात दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार मैत्री दिन म्हणून साजरा होतो.ज्याला फ्रेंडशिप डे असेही म्हणतात. सोशल मीडिया मुळे विविध डे साजरे करण्याचा ट्रेंड खुलतोय.तसाच मैत्री दिनाला ही बहार आलय तो सोशल मीडियामुळेच.
मैत्री ही कुणाही मध्ये होऊ शकते. त्याला स्थळ, काळ, वय असे कोणतेही बंधन नसते.जेथे विचार जुळतात,विश्वास बसतो तेथे मैत्री हमखास होते. फक्त ती मैत्री किती टिकेल? हे अनुभवावर अवलंबून असते. मैत्रीत स्वार्थ असेन तर ती जास्त टिकत नाहीच. मैत्रीचं निखळ सोन चमकते ते केवळ विश्वासावर.अनेक चित्रपटांमध्ये ही निखळ मैत्रीची उदाहरणे दाखविली जातात. थ्री इडियट सिनेमातील मैत्री ही खऱ्या मैत्रीचं सुंदर असे उदाहरण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज हजारो मित्र आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये असले तरीही ज्याच्या जवळ विश्वासाने मन मोकळे करता येईल तोच खरा मित्र. बाकी सगळा फक्त कृत्रिम देखावा.
आई – मुलगी, वडील – मुलगी किंवा मुलगा, आजी – नात, अशी अनेक नात्यांमध्ये ही छान मैत्री असते. जेथे हक्क असतो,ठाम विश्वास असतो. मैत्री साठी प्राण पणाला लावली जाणारी अनेक उदाहरणे इतिहासात बघायला मिळतात.सध्या ताणतणाव चा विळखा खूप वाढला आहे. आणि या तणावाचे बळी ठरणारांची संख्या ही चिंता जनक आहे. अगदी वयाचेही बंधन नाही त्यात. नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या व्यक्तीचा मुख्य आधार ठरतो ती मैत्रीचं. खूप तणावाच्या क्षणी मित्र किंवा मैत्रिणीला केलेला एक फोन किंवा त्याच्याशी झालेले बोलणे क्षणात मनावरचा ताण हलका करते. आणि पुन्हा नवी उभारी देते ती मैत्री.निसर्गाशी मैत्री करणारे ,पक्षी मित्र , सर्प मित्र,प्राणी मित्र, वृक्ष मित्र,पर्यावरण मित्र, अशा अनेक प्रकारच्या मैत्रीची उदाहरणे आजूबाजूला आपण बघतो. मैत्रीतील प्रमख सूत्र असते ते एकमेकांना समजून घेणे. जेथे समजून घेतले जाते तेथेच मैत्री टिकते. मैत्री दिनानिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना फ्रेंडशिप बॅंड बांधण्याची प्रथा सर्वत्र दिसते. विविध रंगाचे फ्रेंडशीप बॅंड मित्र मैत्रिणींच्या हाताला बांधून आपल्या मैत्रीचं पुरावा देण्यात तरुणाईचं नाही तर शाळकरी मुलेही अग्रेसर असतात.
यंदा कोरोना मुळे शाळा कॉलेज बंद आहेत. प्रत्यक्ष भेटून मैत्री दिन साजरा करू शकलो नाही तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मैत्रीची ग्वाही आपण देऊच शकतो. चला तर या मैत्री दिनानिमित्त काही नवीन करूयात. १)आपल्याला समजून घेणार्या मित्र मैत्रीणींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांनाही समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
२)पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी पर्यावरण वादी मित्र हाऊयात.

३)पृथ्वी संरक्षणातील झाडांचे महत्व ओळखून एक फ्रेंडशिप बँड झाडाला बांधून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेऊया.

4)जेवढे मित्र तेवढी झाडे लावूयात आणी त्यांना जगवूयात.

5)परिसर हा जसा आपला आहे तसाच तो प्राण्यांचाही आहेच. प्राणी मित्र होऊन त्यांच्या ही प्रदेशाचे संरक्षण करुयात.

6)मैत्री ही फक्त घराबाहेरील लोकांशि होते असे नाही. घरातील प्रौढ व्यक्ती ,आई वडील,हे ही आपले जिवलग मित्र च आसतात.फक्त आपण त्या दृष्टीने कधी बघत नाही. तेव्हा या मैत्री दिनी त्यांना ही एक फ्रेंडशीप बँड बांधून एकमेकांना समजून घेणारी मैत्री जपूयात.

7)पति पत्नी तील नाते ही मैत्री पूर्ण असल्यास समजून घेणे सोपे जाते.म्हणूनच एक फ्रेंडशीप बँड पतीने आपल्या पत्नीस व पत्नीने आपल्या पतीस नक्कीच बांधायला हवाच.

8)पुस्तकासारखा विश्वासु व खरा मित्र नाही.तेव्हा या मैत्री दिनी आपल्या प्रिय मित्र मैत्रिणीस छानसे पुस्तक भेट दिल्यास मैत्री दिन सार्थ होईल.

9)आपणही कुणाचे जिवलग मित्र होऊन त्यांच्या आयुष्यात इंद्रधनुचे सुंदर रंग भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास मिळणारा आनंद हा अमुल्य असेन.

मनिषा चौधरी, नाशिक
9359960429      

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here