सांगली: सांगली जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 339 कोरोना रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सांगली महापालिका क्षेत्रातील 254 जणांचा समावेश आहे.सांगली शहरातील 173,मिरज शहरातील 81 जण बाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण : आटपाडी तालुक्यामधील -06,जत तालुक्यामधील -10,कडेगाव तालुक्यामधील -2,क.म.तालुक्यामधील -15,खानापूर तालुक्यामधील-3,मिरज तालुक्यामधील -23,पलूस तालुक्यामधील -18,वाळवा तालुक्यामधील -2,तासगांव तालुक्यामधील -1,शिराळा तालुक्यामधील 5 रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.यात सांगली शहर 1,मिरज शहर 1,मिरज-भोसे 1, कर्नाळ 1,पलूस-खटाव 1,तासगाव-वासुंबे 1, येथील 6 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 95 जण कोरोना मुक्त झाले आहेत.ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 1,437 आहेत.जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,643 नोंद झाली आहे.आतापर्यंत1,128 जण झाले कोरोना मुक्त झाले आहे.आज पर्यंत कोरोना बाधित मृत्यू संख्या 78 झाली आहे.