जत,प्रतिनिधी : जतमधील सुभाष राजू वाघमोडे यांनी केलेले गोंधळी समाजातून बहिष्काराचे आरोप बिनबुडाचे व खोटे आहेत.सुभाष वाघमोडे समाजातील अनेक कार्यक्रमात उपस्थित असतो,मग बहिष्कृत्त केले कसे म्हणायचे,असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाघमोडे यांने असे आरोप बंद करावेत,अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा गोधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंदे व परशुराम मोरे यांनी दिला आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,सुभाष वाघमोडे हा गुंड प्रवृत्ती व सुडबुध्दीचा व्यक्ती आहे.त्यांच्या विरोधात जत,उमदी पोलीसात गंभीर गुन्हे दाखल आहेत.अशा प्रवृत्तीमुळे समाजाची बदनाम होत आहे.तु असे प्रकार बंद कर म्हणून समाजातील जेष्ठ मंडळीने समजाविण्याचा प्रयत्न सुभाष वाघमोडेस केला होता.त्यांचा आकस मनात धरत वाघमोडेने समाजातील जेष्ठ मंडळीच्या विरोधात समाजातून बहिष्कृत केले,असा खोटा गुन्हा दाखल करत त्यांने समाजाची बदनामी केली आहे.जेष्ठ मंडळीने पोलीस चौकशीस प्रतिसाद देत वस्तूनिष्ठ तोंडी,लेखी जबाब दिले आहेत.तरीही वाघमोडेकडून समाजाची बदनामी सुरूच आहे.असा प्रकार बंद करावा,अन्यथा आम्हालाही पुढचे पाऊल उचलावे लागेल,असे शिंदे व मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी श्रीकांत मोरे,बिराप्पा मोरे,सुरेश वास्टर,सुभाष मारूती वाघमोडे, यांच्यासह समाजातील जेष्ठ मंडळीच्या सह्या आहेत.