हिवरे वनहद्दीत दुर्मिळ पक्षाची शिकार | सावळजच्या दोघा शिकाऱ्यांना अटक : दोन दिवस कस्टडी

0
3

जत,प्रतिनिधी : हिवरे ता.जत येथील वनविभागाच्या हद्दीत दुर्मिळ होत चाललेल्या चित्तर पक्ष्याची शिकार केल्या प्रकरणी दोघा शिकाऱ्यांना वन विभागाच्या गस्ती पथकाने पकडले.

संदिप प्रकाश टोकले,(वय-19),अमित संभाजी जाधव(वय-23,दोघे रा.सावळज)असे पकडलेल्या शिकाऱ्यांचे नाव आहे.




तुबची-बबलेश्वर योजना : सांगलीत आढावा


याबाबत सविस्तर माहिती,रवीवारी रात्री हिवरे येथील वनविभागाच्या हद्दीत एयरगणच्या माध्यमातून संशयित दोघे दुर्मिळ अशा तित्तर पक्षाची शिकार करत असताना वन विभागाच्या गस्ती पथकाला आढळून आले.पथकातील अधिकाऱ्यांनी त्या हाटकले,मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला,पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.त्यांनी पकडलेले 6 तित्तर पक्षी,एयरगण,एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.




मार्किंग झाले,आजपासून काम सुरू होणार | शहरातील महामार्ग : आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याकडून ठेकेदार अधिकाऱ्यांची कानउघाडणी |

वन संरक्षण कायद्याअतर्गंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सोमवारी जत न्यायालयात उभे केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी सुनावली.

वन क्षेत्रपाल महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडल वन अधिकारी शंकर गुगवाड,शकिल मुजावर,वनसंरक्षक गणेश दुधाळ,आप्पासो नरूटे,यांच्या पथकांने कारवाई केली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here