जत,प्रतिनिधी : जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे जे पुर्वीपासून सिटी सर्व्हेला जी नोंद आहे,तेथेपर्यत मार्गाकडेचे अतिक्रमण काढून काम आज पासून सुरू करण्याचे आदेश आमदार विक्रमसिंह सांवत यांनी अधिकारी व ठेकेदरांला दिले.दरम्यान तातडीने रस्ते प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची मोजणी करून मार्किंग केले आहे.
आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढून मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
शहरात गेल्या चार आठवड्यापासून पडत असलेल्या पाऊसामुळे या महामार्गाचा पांणद रस्ता झाला आहे.मार्गावरून जा-ये करणाऱ्यांच्या कमरेचे आजार जडले आहेत.तर वाहनाचा खुळखूळा झाला आहे.अनेक वेळा बैठका घेऊनही काम सुरू न केल्याने उपस्थित अधिकारी,ठेकेदारांची आमदार सांवत खरडपट्टी केली.कोणाचा मुहालिजमा न ठेवता जे पुर्वीपासून नोंद आहे त्यानुसार अतिक्रमणे काढून रस्ता ताब्यात घ्यावा.पाठीमागे आहे जेवढा रस्ता करावा.उर्वरित जागेवर गटारी,फुटपाट करण्यात यावेत, अशा सुचना यावेळी आमदार सांवत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान आमदारांचा रुद्रआवतार बघून उपस्थित अधिकाऱ्यांनी तातडीने मार्गाची मोजणी करून मार्किंग केले आहे.आज अतिक्रम काढून महामार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
बैठकीला प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील,प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी डॉ.निलेश पाल वे,रस्ते प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ.निलेश पालवेचा सत्कार
बैठकीनंतर प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी डॉ.निलेश पालवे यांचा
वाढदिवसा निमित्त आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्षगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
या ‘महामार्गाचे काम सुरू होणार तरी कधी’ या मथळ्याखाली दैनिक संकेत टाइम्सने रवीवारी वृत्त प्रसिद्ध केले होते.त्यांची दखल घेत तातडीने कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी डॉ.निलेश पालवे यांचा सत्कार करताना आमदार विक्रमसिंह सांवत बाजूस प्रंशात आवटे, सचिन पाटील आदी