जतचे नवे दुय्यम निबंधक कार्यालय परिसर पुन्हा धोक्याच्या वळणावर | सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

0

जत,प्रतिनिधी :जत शहरासह तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाचे नऊ रूग्ण पाॅझीटीव्ह आढळून आल्याने जत शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. जत दुय्यम निबंधक कार्यालयात महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील पक्षकार जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहारकामी कार्यालयात येत आहेत. जत दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे ठिकाणी पक्षकारांची चांगल्या प्रकारे बसण्यासाठी सोय केली असलीतरी कार्यालयाच्या खालील बाजूस असलेल्या जागेत पक्षकारांची बैठक व्यवस्था करण्यात आली नाही. त्यातच या जागेत मुद्रांक विक्रेते हे छोटेखानी काउंटर मध्ये मुद्रांक विक्री व दस्त तयार करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मुद्रांक विक्रेते यांच्या काऊंटरसमोर कायम पक्षकारांची मोठी गर्दी असते.पक्षकार मुद्रांक खरेदी करताना व खरेदी -विक्री दस्त तयार करताना सोशल डिस्टन्सिंग चे पालन करित नाहीत. 






Rate Card



    त्यातच या कार्यालयाजवळच असलेल्या किराणा व स्टेशनरी दुकानासमोर हे पक्षकार कार्यालयात पुरेशी बैठक व्यवस्था नसल्यामुळे दाटीवाटीनी ऊभे राहतात. तसेच या दुकानातून तोंडाला लावणारे मास्क व स्टेशनरी वस्तूंची ही खरेदी ही करतात.या किराणा व स्टेशनरी दुकानदार असलेल्या शिक्षकाच्या वृद्ध आईलाच कोरोना झाल्याने जत शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. कारण दुय्यम निबंधक कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो लोकांचा संपर्क या किराणा दुकानाशी आला आहे. त्यामुळे सबंधित वृद्ध महिला ही कोणाचे संपर्कात आल्यामुळे तीला कोरोणाची लागण झाली आहे याचा शोध घेणे प्रशासनापुढे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 















जतेतील मोरे कॉलनीत कोरोनाचा शिरकाव | दुय्यम निंबधक कार्यालयासह तालुका हादरला : एकाच दिवशी नऊ नवे रुग्ण |

जत दुय्यम निबंधक कार्यालयात कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या सोलापूर, पुणे पिंपरी -चिंचवड ,मुंबई, सांगली, कोल्हापूर व कर्नाटक राज्यातील विजयपूर व बेळगाव जिल्ह्यातील पक्षकार हे जमिन खरेदी-विक्रीचे तसेच कारखाना करारासाठी मुद्रांक खरेदी करण्यासाठी येत आहेत.त्यामुळे या कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग चे पालन होत नसल्यामुळे कोरोनाची भिती ही अशीच राहणार आहे.जत दुय्यम निबंधक कार्यालयाजवळच कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण सापडल्याने आता हा परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर केला जाईल. त्यामुळे हे कार्यालय चौदा दिवसांसाठी तरी बंद ठेवावे लागेल. तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांना तसेच कार्यालयीन मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक तसेच कार्यालयात व किराणा दुकानात आलेल्या पक्षकारांना होम काॅरंटाईन करण्यात येणार आहे. आतापर्यंत जत शहरापासून एक कि. मी. अंतरावर असणारे वसाहतीमध्ये  कोरोनाचे रूग्ण आढळून आले होते. परंतु मोरे काॅलनी संभाजी नगर या मोठी लोकसंख्या असलेल्या नगरात कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण सापडल्याने प्रशासनाला योग्य ती दक्षता व खबरदारी घ्यावीच लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.