12 वी बोर्ड परीक्षेत राजे रामराव महाविद्यालयात डफळापूरची सौजन्या महाजन प्रथम

0

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे अर्थात एचएससी बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यात जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एस ढेकळे यांनी दिली.महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 94.15 एवढा लागला असून कु. सौजन्या रमेश महाजन हिने 83.30 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर कु. राणी उत्तम कांबळे हिने 81.07 टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक मिळविला.तसेच कु. राणी कांबळे हिने गणित विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळविले.बिळूर आणखीन काही दिवस लॉकडाऊन ; प्रांताधिकारी | अजूनही परिस्थिती गंभीर,नियम पाळा |

Rate Cardमाहिती तंत्रज्ञान या विषयामध्ये सौजन्या महाजन हिने 100 पैकी 100 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. कला शाखेचा निकाल 52.90 टक्के, वाणिज्य शाखेचा 85.71 टक्के लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एस ढेकळे यांनी अभिनंदन केले. कनिष्ठ विभागातील  प्रा. धनगोंड, प्रा. पी.ए. सावंत, प्रा. समिर शेख, प्रा. सचिन लोखंडे, प्रा. जत्ती,  प्रा. नामदेव जंवजाळ, प्रा. आफताब खतिब, प्रा. बी.एम.बेंडेपाटील, प्रा.दिनेश वसावे यांनी प्राचार्य व्हि.एस. ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली जादा तासांचे नियोजन, सराव परिक्षेचे  नियोजन केले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य व्हि.एस. ढेकळे यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.