डफळापूर,वार्ताहर : डफळापूर पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकळे ता.कवटेमहाकांळ येथे रवीवारी चार कोरोना बाधित रुग्णाचे अहवाल आले आहेत.
जतच्या रस्त्याला ठेकेदाराची किड | केलेले रस्ते वर्षातच खड्ड्यात
एका कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील दोन महिला व दोन मुलाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डफळापूर पासून पाच किलोमीटर वरील कोकळेत एकाच दिवसात चार रुग्ण बाधित झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली आहे. आरोग्य विभागाची पथके कार्यरत करण्यात आली आहेत.