सांगली : जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी गेले.मिरज शहरातील माने प्लॉट येथील 80 वर्षीय व सुंदर नगर येथील 78 वर्षीय वृद्ध महिलांचा मृत्यू झाला.जिल्ह्यात आणखी 9 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.बाधित रुग्णापैंकी उपचार घेणारे 13 जण झाले कोरोना मुक्त झाले आहेत.जिल्ह्यात अँक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 304 वर गेली आहे.जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 641 रुग्णाची नोंद झाली आहे.आज पर्यंत कोरोना बाधित मृत्यू संख्या 19 जणांचा मुत्यू झाला आहे.
आज रविवारी सोनी (मिरज)52 वर्षाचा पुरूष,बुधगाव(मिरज)42 वर्षाचा पुरूष,कोकळे येथील 33,26 वर्षाचा दोन महिला व 7,3 वर्षाची मुले,पलूस येथील 92 वर्षाची महिला,सांगली महानगरपालिकेतील 60 व 73 वर्षाचे पुरूष कोरोना बाधित आढळून आले आहेत.