जत,प्रतिनिधी : संख प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना साखळी तोडण्यास सज्ज झाले आहेत.संख व दरीबडची लमाणतांडा येथील 17 जनांचे स्वाब टेस्ट घेतलेले अखेर सर्व निगेटीव्ह आले आहेत.
जत तालुक्यातील संख व दरीबडची लमाणतांडा येथे दि.7 जुलै रोजी कोरोना बाधित रुग्ण आढळले होते.खबरदारी म्हणून तिथला परिसर सील करण्यात आला होता. तिथला परिसर कंटेनमेंट झोन व बफर झोन घोषित करण्यात आले होते.त्या दोन्ही झोनमधिल कोरोना बाधिताच्या संपर्कातील 17 जणांचे अहवाल अखेर निगेटीव्ह आल्याने सुटकेचा निश्वास यंत्रणांनी सोडला आहे. संख व दरीबडचीतील लमाणतांडा येथील कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेले लमाणतांडा येथील बाधीत रूग्णाच्या घरातील 6,इतर 3,लमाणतांडा येथील खाजगी डॉक्टर असे एकूण 10 तर संख मधिल कोरोना बाधित रूग्णाच्या घरातील 4 व खाजगी व्यवसाय करणारे डॉक्टर 1 व कर्मचारी 2 असे 3 असे 17 जणाचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.
कुपवाडमधील खूनाचा छडा | जत तालुक्यातील जिरग्याळ येथून संशयित ताब्यात
त्यांचे रविवारी अहवाल आले.त्यात सर्वजण निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे.तरीही आरोग्य विभागाकडून सर्वोत्तरी दक्षता घेतली जात आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली संख प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुशांत बुरूकुले,डॉ.स्नेहल सावंत यांची पथके सध्या या गावात कार्यरत आहेत.