जत : जत – विजापूर रोडवर नगार टेका जवळ अंबादास अर्जुन चव्हाण (वय ७०, सध्या रा. उमराणी रोड, हत्तीमळा, जत, ता. जत मूळ रा. शनिवार पेठ, सांगोला नाका, मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापूर) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे झाली. ती सकाळी सहा वाजता नातेवाईकांना समजली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात मयताची मुलगी शोभा अशोक क्षीरसागर हिने फिर्याद दिली आहे.
अंबादास चव्हाण हे आपली पत्नी वारल्यापासून मुलीकडे नऊ वर्षे जत येथे राहत होते. अधून मधून ते त्यांच्या गावी घरी मंगळवेढा येथे जात येत होते. दि.१५ नोव्हेंबर रोजी सकाळी वडील मंगळवेढा येथे जावून येतो, असे सांगून ते निघून गेले. मात्र, रविवारी सकाळी जत ते मुचंडी जाणाऱ्या रोडवर नगार टेक, मारुती मंदिराजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याने वडिलास ग्रामीण रुग्णालय जत येथे उपचाराकरिता घेऊन आले असता डॉक्टरांनी ते मयत झाले असल्याचे सांगितले.
अज्ञात वाहनाने धडक देऊन त्यांना उपचाराकरिता घेऊन न जाता तसेच हयगयीने वाहन चालवून वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनाविरुद्ध तक्रार दिली आहे.