जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील जत,निगडी(जत),गुलगुंजनाळ येथील प्रत्येकी एक व बिळूर येथील दोन व्यक्तीचा गुरूवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जत तालुक्यातील कोरोना बाधित संख्या 86 वर पोहचली आहे.तर तिघांचे प्रकृत्ती चिंताजनक आहे.
जत तालुक्यातील कोरोना हॉस्टस्पॉट बनलेल्या बिळूरमधील कोरोना प्रभाव कमी होत असताना इतर गावात कोरोना बाधित रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.
गुरूवारी बिळूरमधील 25 वर्षाची महिला,45 वर्षाची महिला असे दोन रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.तर निगडी(जत) येथील 32 वर्षाचा पुरूष,गुलगुंजनाळ येथील 32 वर्षाचा पुरूष,तर जत येथील 32 वर्षाचा पुरूष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
तालुका प्रशासनाकडून बाधित रुग्ण आढळून येताच खबरदारी घेत गावात उपाय योजना सुरू केल्या आहेत.औषध फवारणी,परिसर सील करून संपर्कातील लोकांचा शोध घेत संस्था क्वॉरंटाईन करण्यात येत आहे.स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राची पथकांकडून बाधित रुग्ण आढळून आलेल्या गावात नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.
सध्या बाधित रुग्णांपैंकी दरिबडची येथील 28 वर्षीय पुरूष,उमदी येथील 40 वर्षाचा पुरूष,जत येथील 32 वर्षाचा पुरूष यांची प्रकृत्ती चिंताजनक असून या तिंघाना नॉन इन्व्हेजीव व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे.