जतमधील पवनचक्की प्रकल्पावर चोरट्यांचा दरोडा | लाखों रूपयाच्या केबलची चोरी ; कोट्यवधीचे नुकसान : मास्टरमाईंड मोकाट

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात असणाऱ्या पवन ऊर्जा प्रकल्पातील चालू पवनचक्कीचे सर्किट जाळून त्यातील तांब्याच्या लाखो रुपयाच्या तारा चोरट्यांनी मध्यरात्री पळविल्या आहेत.आतापर्यत सहा वेळा अशाच पध्दतीने चोऱ्या झाल्या आहेत.त्यात कोट्यावधीचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे.विशेष म्हणजे या सहाही वेळा जत पोलीसात गुन्हा दाखल होऊनही एकाही घटनेचा छडा लागलेला नाही.सन 2017 पासून आत्तापर्यंत आयनॉक्स विंड या कंपनीच्या  पवनचक्क्यातील केबलची चोरी झाली आहे.मंगळवारी पुन्हा एका पवनचक्कीतील ताब्यांच्या तारांची चोरी 

झाली आहे.आयनॉक्स विंड व अन्य एका 

Rate Card

कंपनीच्या पवनचक्कीसह सुमारे एकूण 14 पवनचक्कीच्या तारा 

जाळून पळवून नेहण्यात आल्या आहेत.त्यात प्रत्येक पवनचक्की 1 कोटी प्रमाणे 14 कोटीचे आतापर्यत नुकसान झाले आहे.

पवनऊर्जेला चांगला वाऱ्याचा प्रवाह असल्यामुळे देशातील व देशा बाहेरील कंपन्यांनी जत तालुक्यात आपले पोजेक्ट उभे करून सुमारे 450 पवनचक्क्या उभारत यातून दररोज सुमारे 30 हजार युनिट विद्युत निर्मिती केली जाते. या पवनऊर्जा उद्योगामुळे तालुक्यातील गावांचे महसूल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.त्यातून आलेल्या करामुळे तालुक्यातील अनेक गावातील मोठ्या प्रमाणात विकास कामांना आर्थिक पाठबंळ मिळाले आहे.त्याशिवाय या पवनऊर्जा कंपनीकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही केले जात आहे.

पंरतू या पवऊर्जा कंपन्याच्या पवनचक्क्यातील लाखो रूपयांच्या ताब्यांच्या तारा चोरीमुळे अडचणीत आल्या आहेत.गेल्या काही वर्षात अशा तारा चोऱ्यांना टोळ्या तयार झाल्या आहेत.आतापर्यत आयनॉक्स कंपनीच्या वळसंग नजिकच्या पवनचक्कीत मंगळवारी मध्यरात्री तारेला जाळून पवनचक्कीत आत घुसत सुमारे 1 कोटीची तांब्याची तार तोडून तेथेच जाळून पळविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.आतापर्यत या कंपनीच्या तीनवेळा अशाच पध्दतीने चोऱ्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वेळी पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मात्र अद्याप पर्यत चोऱ्याचा छडा लागलेला नाही.जतला नव्याने आलेले पो.नि.तथा प्रशिणार्थी डिवायएसपी डॉ.निलेश पालवे यांनी विशेष लक्ष या चोऱ्यांचा छडा लावावा,अशी मागणी कंपन्याकडून करण्यात आली आहे.

 जत तालुक्यात पवनचक्की उभारणी निमित्त्याने पाठोपाठ कंपन्यात दाखल झाल्या कोट्यावधीची गुंतवणूक करून त्यांची उत्पन्न सुरू केले काही वर्षातील वाढत्या या रस्त्यामुळे तब्बल साडेचारशे पवनचक्की तालुक्यात उभारले आहेत पवनऊर्जा निमित्ताने आलेल्या व्हाईट ती मुळे डोंगर भागातील शांतता सामान्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे गेल्या काही दिवसात पोलिसांपर्यंत आलेल्या तक्रारीवरून आणि उघडे ही कागदावर नसलेल्या काही ही प्रकारावरून स्पष्ट होत आहे तांब्याच्या जोरात तारेतून लूट करून चोरट्यांनी आत्तापर्यंत विभागातील दूरध्वनीच्या केबल ना लक्ष बनवण्याचे ऐकिवात होते आता त्यांनी मोठा हात मारण्याच्या उद्देशाने पवनचक्कीच्या केवला वर लक्ष केंद्रित केलेले दिसत आहे कालच जत पासून थोड्या अंतरावर आयनॉक्स कंपनीची चालू पवनचक्की बंद पाडून तेथील केबल ची चोरी करण्यात आली मधून आत घुसून त्यांनी बंद पवनचक्कीची केबल कापली आणि जागेवरच जाळून त्यातील तारा लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला यापूर्वी याच कंपनीच्या तीन पवनचक्क्या चोरी झाली होती जत वळसंग शेळके वाडी परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहेत बसवलेली यंत्रणा बाहेर देशातून येत असल्याची त्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे ज्या ज्या वेळी परिसरात अशा चोरीचे प्रकार घडेल त्या त्या वेळी पवनचक्की कडून वीज निर्मिती बंद असल्याने आढळले त्यातून मोठा फटका बसत आहे त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकाला कडून पोलिसात नोंद करण्यात आली मात्र तो फारच आहे आता हा प्रकल्प चोरट्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी पोलिस यंत्रणेला कंबर कसावी लागणार आहे रक्षका सह यंत्रणाही कुचकामी प्रत्येक टावर साठी सुरक्षा रक्षक निवडीत त्याबरोबर गस्ती पथके आहे प्रत्येक टॉवरला अलर्ट सिस्टीम मी बसले आहे परंतु जोडीने येणाऱ्या चोरट्या समोर ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे चोरून नेलेल्या कुठे विकल्या जातात त्याचा मास्टरमाइंड कोण याची पाळेमुळे खोदण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे

कोट्यवधी रुपयांचा फटका जत तालुक्यातील अधिकारी आहेत एका पवन चक्की तून दररोज सुमारे 30 हजार युनिट विद्युत निर्मिती केली जाते एक लाख 74 हजार 300 रुपयांनी विकली जाते रंतु तिथे बसलेली यंत्रणा पाश्‍चात्त्य देशातील असल्याने साधारणता या दुरुस्तीसाठी एका पवनचक्की साठी एक कोटी रुपये खर्च येतो वीज निर्मिती थांबल्याने बसणारा फटका वेगळाच जत परिसरात काही दिवसात फोनची की बंद पाडून केबलची चोरी करण्याचे प्रकार सहसा घडत आहे चोरलेली केबल बाजारभावाने दहा-पंधरा लाखांना विकली जाते परंतु त्याची नव्याने दुरुस्तीसाठी कंपनीला कोट्यवधीचा खर्च येतो वीज निर्मितीचा खर्चही मोठा आहे ोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे

चोऱ्यामुळे कंपन्याना कोट्यावधीचा फटका

तालुक्यातील या पवनऊर्जा उद्योगातील या तारांच्या चोऱ्यामुळे कंपन्याना कोट्यावधीचा नुकसान सहन करावे लागले आहे.कंपन्याचे हे मटेरियल बाहेर देशातून आयात केले जात आहे. ते येईपर्यत पवनचक्की बंद ठेवावी लागते.त्यामुळे चोरीबरोबर पवनचक्की बंद राहिल्याने निर्मिती थांबते.त्यामुळे कंपन्याना दुहेरी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.दरम्यान सततच्या चोऱ्याला वैतागलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनाने जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे.

चोरट्याचे मास्टरमाईंड पकडण्याची गरज

यापुर्वी तालुक्यात बिएसएनएल सह खाजगी कंपन्याच्या तांब्याच्या तारा चोरण्याचे प्रकार घडत होते.सन 2017 पासून पवनऊर्जेच्या ताब्यांच्या तारावर चोरटे दरोडे टाकत आहेत.कोट्यावधीच्या या चारा काही लाखात चोरट्यांनी विकल्या जात असल्याचे समोर येत आहे.मात्र आतापर्यत अशा चोऱ्यांचे मास्टरमाईंड समोर आलेले नाहीत.काही पोलीसांच्या अर्थपुर्ण सहयोगामुळे अशा चोरट्यांना बंळ मिळत असल्याची चर्चा आहे.

वळसंग नजिकच्या पवनचक्क्याच्या काही भाग जाळून तांब्याची तार पळविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.