सांगली : सांगली जिल्ह्यात मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाचा 14 वा बळी गेला.
सांगली जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 22 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मिरजेच्या अमननगर येथील 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आजच्या कोरोना बाधित
रुग्णामध्ये जत तालुक्यातील 7 बाधिताचा समावेश आहे.तर सांगली महापालिका क्षेत्रातील 4 जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील आजचे नवे कोरोना रुग्ण जत तालुक्यातील बिळूर येथील 4,संख 1, दरीबडची 1, उमदी 1,पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील 5 , अमणापुर येथील 3,पलूस शहर 1,आणि वाळवा तालुक्यातील बावची 1,केदारवाडी येथील 1 यांचा समावेश आहे.
सांगली महापालिका क्षेत्र 4,मिरज शहर – माने प्लॉट -1 दत्त कॉलनी -1, आणि सांगलीतील हनुमान नगर -1 व कोल्हापूर रोड 1 , असे 4 जणांचा समावेश आहे.
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 250,जिल्ह्याची एकूण 541 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.आता पर्यंत 277 जण झाले कोरोना मुक्त,तर आतापर्यंत 14 जणांचा मृत्यु झाला आहे.