जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सिंघम स्टाईल पोलीस निरिक्षक रामदास शेळके यांची बदली होताच मटका,जुगार,
बेकायदा दारूसह अवैध धंदेसह चोरटे व गुन्हेगार सक्रीय झाले आहेत.त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
जतचे भूतपूर्व पो.नि.रामदास शेळके यांच्या सहा महिन्यात सोशल पोलीसींगीचे वेगळेपण दाखवत क्राईम रेट कमी केला होता.रामदास शेळके यांच्या नावाला घाबरणारे सराईत गुन्हेगार,चोरटे पुन्हा सक्रीय झाले आहेत.पोलीस ठाणे आवारातही अशा गुन्हेगाराचा वावर वाढल्याचे चित्र आहे.
सध्या पोलीस ठाण्यातील झारीतील शुक्रचार्यांच्या आर्शिवादाने कोरोनामुळे बंद असलेले अवैध धंदे राजरोसपणे सुरू झाले आहेत.
त्याशिवाय पुन्हा चोऱ्यांच्या घटना घडू लागल्या आहेत.रवीवारी मध्यरात्री पवनऊर्जा कंपनीचे सुमारे पन्नास लाखाचे साहित्य जाळून टाकत चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.त्याशिवाय घर पेटविणे,हाणामारीसह,दहशत निर्माण करण्याचे काही गुन्हेगाराकडून प्रयत्न होत असल्याचे समोर येत आहे.
नव्याने आलेले प्रशिक्षिणार्थी डिवायएसपी डॉ.निलेश पालवे यांनी या चोरट्यासह गुन्हेगाराविरोधात विशेष मोहिम उघडण्याची गरज आहे. त्याशिवाय आता उद्योगांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस ठाण्यातील झारीतील शुक्रचाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
कुणाचीही गय करणार नाही
जत पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यासह,गुन्हेगाराची माहिती गोळा केली जात आहे.यापुढे कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही.माझा कार्यकाळ कमी आहे,तरीही जतेत कायदासुव्यस्था आबाधित ठेवण्यासाठी सर्वोत्तम योगदान देऊ.
डॉ.निलेश पालवे,प्रक्षिणार्थी डिवायएसपी