जत,प्रतिनिधी : कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर मध्ये 5 जून 2020 रोजी 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती.बलात्कार करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई करा,अशा मागणीचे निवेदन क्षत्रिय जन संसद, नवी दिल्ली यांच्यावतीने जतचे तहसीलदार यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मुलीला खाऊचे अमिष दाखवून वेळोवेळी आरोपींनी मुलीवर बलात्कार केला. संशयित आरोपी यशवंत मारुती आयवळे बय 67 आणि निवास मारुती आयवळे वय 57 यांच्यावर कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.या दोन्ही संशयित आरोपींना कडेगाव पोलीसांनी अटक केली आहे.ही घटना अमानवीय आणि माणुसकीला काळिंबा फासणारी आहे.
यातील यशवंत आयवळे हा आरोपी स्वतःच्या पत्नीच्या हत्येच्या गुन्हा आधीच शिक्षा भोगून आला आहे. पीडित मुलीला यांच्या घरा समोरूनच घरी येण्या जाण्यासाठी रस्ता आहे. त्यामुळे तिला जीवे मारण्याची धमकी देऊन या दोन्ही नराधमानी वेळोवेळी बलात्कार केला.तुझ्या घरच्यांना सांगितले तर घरातील सर्वाना मारून टाकण्याची धमकी दिली होती.पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर आई डॉक्टरांकडे मुलीला घेऊन गेली त्यानंतर हा प्रकार समोर आला.
त्यांनतर पोलीसात गुन्हा करू नये,यासाठी या संशयित आरोपींनी पीडित मुलीच्या नातेवाईकांना मारहाण केली.त्यामुळे या घटनेचे प्रकरण फास्टट्रेक कोर्टात चालवून या नराधमांना कठोर शिक्षा करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रीय क्षत्रिय जन संसद, नवी दिल्लीचे राष्ट्रीय सभापती महेशजी पाटील (बेनाडीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र राज्यचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य शाहूराजे डफळे, जिल्हा सदस्य जयंत भोसले, सदस्य हिमवानराजे उर्फ राजेसाहेब डफळे हे उपस्थित होते.
कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर येथील अल्पवयीन बलात्कार प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.