जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथे शुक्रवारी वीस जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबंळ उडाली आहे.बिळूरची संख्या आता 46 झाली असून बिळूर कोरोना हॉटस्पाट झाले आहे.पहिला कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कामुळे बिळूरमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. गावातील सुमारे 100 वर संपर्कातील लोकाचे स्वाब तपासणी साठी घेण्यात आले आहेत. त्यापैंकी शुक्रवारी तब्बल 20 जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.