जत,प्रतिनिधी : संख अप्पर तहसील कार्यालय येथे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारासाठी दुय्यम निंबधक कार्यालय सुरू करण्याची मागणी जत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने करण्यात आली. तसे निवेदन पालकमंत्री जयंत पाटील यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे,जत हा तालुका सांगली जिल्ह्यातील विस्ताराने सर्वात मोठा असणारा कर्नाटक राज्याच्या सिमेवरील कायमस्वरूपी दुष्काळी असा तालुका आहे.तालुक्यात एकूण एकशे विस गावे आहेत.
तालुक्यात जत येथे तहसिल कार्यालय असून संख येथे अप्पर तहसिल कार्यालय आहे. संख अप्पर तहसिल कार्यालय अंतर्गत चार मंडल विभाग येतात.या विभागात संख,उमदी, माडग्याळ व मुचंडी या मंडल विभागाचा समावेश आहे. या चार विभागात एकूण 67 गावे असून या सर्व गावाचा महसुली कारभार हा अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चालतो.संख येथे अप्पर तहसिल कार्यालय येथे दुय्यम निंबधक सह सर्व विभागाची कार्यालयाचे पुर्ण क्षमतेने काम सुरू करावीत,अशी मागणी आहे.सध्या जत तहसिल कार्यालयात विविध कामांसाठी ये जा करण्यासाठी होणारा,हेलपाटे, अनमोल वेळ व पैशाची बचत करण्याचे काम केले आहे.त्याप्रमाणेच संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करून जत पूर्व भागातील चार मंडलविमागातील व 67 गावातील लोकांची दुय्यम निबंधक कार्यालया अभावी होणारी अडचण व गैरसोय दूर करावी.
संख येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरू झाले असून महसुल विभागाची बहुतांशी कामे ही या कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत. परंतु संख अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चार मंडल विभाग व या विभागातील 67 गावातील लोकांना त्यांच्या जमिनिचे, घरजागेचे,प्लाॅटचे व्यवहार तसेच विविध बॅंकाकडील,सोसायट्याकडील तारण गहाण खत, तसेच बक्षिस पत्र व मृत्यूपत्र आदी कामासाठी येथील नागरिक व पक्षकारांना तालुक्याच्या ठिकाणी जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयातच येणे शिवाय दुसरा पर्याय उरत नाही. या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यास या भागातील लोकांचा जत येथे जाणे-येणेचा त्रास वाचणार आहे. व संख पासून जत दुय्यम निबंधक कार्यालयाचे अंतर ही लांब असल्याने व दुय्यम निबंधक कार्यालयात आल्यानंतर जत पूर्व भागातील लोकांची कामे एका दिवसात न होता. त्यासाठी चार चार दिवस पक्षकारांना कामासाठी ताटकळत बसावे लागत असल्याचा येथील पक्षकारांना अनेक वेळा अनुभव आला आहे. तसेच याकामी त्यांचा वेळ व पैसाही खर्च झाला आहे.जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालय हे जत तालुक्यातील पूर्व भागातील नागरिक व पक्षकारांच्यादृष्टीने अडचणीचे व गैरसोईचे होत असल्याने जत पूर्व भागातील संख येथे नविन दुय्यम निबंधक कार्यालयास लवकरात लवकर मंजूरी मिळून हे कार्यालय लवकरात लवकर सुरू होऊन येथील नागरिक व पक्षकारांची सोय व्हावी यासाठी आपले मार्फत जत तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांची मागणी पुर्ण करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी, युवक तालुका अध्यक्ष उत्तम चव्हाण, सतीश उर्फ पवन कोळी तालुकाध्यक्ष विद्यार्थी संघटना, हेमंत खाडे,सागर चंदनशिवे, राहुल बामणे, मयूर माने, अमरसिंह मानेपाटील उपस्थित होते.
संख येथील अप्पर तहसील कार्यालय येथे दुय्यम निंबधक कार्यालय सुरू करा,या मागणीचे निवेदन देण्यात आले.