जत,प्रतिनिधी : वाळेखिंडी ता.जत येथे 22 मे रोजी गावातील एका युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. संपूर्ण गाव हादरून गेले होते.गावात प्रशासनाने तातडीने दक्षता घेत उपाययोजना केल्या होत्या.संपूर्ण गाव काही दिवस सील केले होते.त्या युवकाचा उपचारानंतर चौदा दिवसापूर्वी कोरोना तपसणीत निगेटीव्ह रिपोर्ट आला होता.मंगळवारी त्या युवकाला घरी सोडणेत आले.त्या तरुणाचे गावात फटाके वाजवून स्वागत करणेत आले.तसेच आरोग्य सेविका तेजल भामरे यांनी आशा सेवक यांना सोबत घेऊन चांगली सेवा केली त्याबद्दल त्याचा हि सत्कार करणेत आला.
यावेळी माजी सभापती शिवाजी शिंदे,आपासो विसापूरे,तानाजी शिंदे,महादेव हिंगमिरे,प्रकाश कोरे,दीपक विसापूरे,शिवानंद लकडे,शशिकांत भामरे उपस्थित होते.दिगंबर शिंदे सरांनी मनोगत व्यक्त केले.