जत | विनापरवाना परराज्यातून जतमध्ये आलेल्या पाचजणावर गुन्हा दाखल

0

जत,प्रतिनिधी : कोरोना लॉकडाऊन असतानाही कोणतीही परवानगी न घेता  कोईमतूर येथे सोने,चांदी दुकानात काम करणारे कामगार व त्यांच्या कुटुंबातील पाचजण अज्ञात वाहनाने त्यांचे मुळगाव अंबवडे ता.खटाव येथे जात असताना

पाच्छापूर फाटा (ता.जत) येेते त्यांना जत प्रशासनाने ताब्यात घेत जणांवर राष्ट्रीय आपत्ती कायदा भंग केल्याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Rate Card

विमल पोपट पिंगळे (वय 55),शंकर पोपट जोंजाळे(वय 25),बालाजी रमेश देवकर (वय 18),अजित यशवंत जोंजाळे (वय 20),रोहणी जोंजाळे (वय 21,सर्वजण रा.आंबवडे ता.खटाव जि.सातारा)येथील आहेत.संबधित लोक कोईमत्तूर येथून जतमार्गे त्यांच्या खटाव तालुक्यातील आंबवडे या मुळगावी जाणार होते.यांची माहिती रावळगुंडवाडी येथील सरपंच यांना माहिती समजल्यानंतर त्यांनी तालुका प्रशासनाला कळविले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती कायदा लागू असताना कायद्याचा उल्लंघन करून  विनापरवाना जत मध्ये केल्याप्रकरणी पाच जणावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची जत पोलिसात फिर्याद मंडळ अधिकारी संदिप मोरे यांनी दिली आहे.सर्वांना 14 दिवसासाठी येथील खाजगी संस्थेच्या इमारतीत आरोग्य विभागाच्या निगराणीखाली होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.विशेष म्हणजे हे सर्वजण दोन राज्याच्या सिमा ओलाडूंन जत तालुक्यात आले आहेत,हे विशेष..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.