जत,प्रतिनिधी : राज्यभर कोरोना विषाणुचा प्रभाव वाढत आहे.लॉकडाऊनमुळे नागरिक अडचणीत आले आहेत.सध्या कोरोना रोकण्यासाठी बरोबर प्रशासनाच्या मदतीने आपल्यासह कुंटुबियाचा बचाव करण्याची गरज आहे.या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी निगडी,काराजनगी, घोलेश्वर,सनमडी, कुणीकोनूर,टोनेवाडी आणि खैराव या गावामध्ये गरजू लोकांना मास्क व सॅनिटीझर वाटप केले.त्याचबरोबर या गावामधील नागरिकांनी संवाद साधला.रेशनकार्ड धारकांना स्वस्तधान्य दुकानात नियमानुसार गहू तांदूळ मिळतो का ?,गावातील पिण्याची पाण्याची सोय,आरोग्य कर्मचारी यांनी गावामध्ये तपासणी व निर्जंतुकीकरन केले आहे का? यांची माहिती घेतली.या काळात कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये,याची काळजी घेण्याची गरज आहे.नवीन लोक आल्यास त्यांची तात्काळ माहिती आरोग्य यंत्रणांना द्यावी.प्रशासन मोठ्या ताकतीने काम करत आहे, त्यांना सहकार्य करावे.तालुक्यातील नागरिकांच्या मदतीसाठी मी सदैव उपलब्ध आहे. अडी-अडचणीसाठी संपर्क साधावा,असे आवाहन प्रकाश जमदाडे यांनी केले.
कुनीकोणूर येथे मास्क वाटप करताना रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे