जत | माजी सभापती तम्मणगौंडा रवीपाटील यांच्याकडून 1 टन गहूची मदत |

0
1

जत,प्रतिनिधी : जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मणगौंडा रवीपाटील यांच्याकडून गरजू नागरिकांच्या मदतीसाठी 1 टन गहू तालुका प्रशासनाकडे सुपुर्द केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मणगौंडा रवीपाटील यांनी एक टन गहू मदत म्हणून तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे सुपुर्द केला.लॉकडाऊनमुळे  निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता गरीब व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे मदतीची मोठी गरज ओळखून सभापती पाटील हे तालुक्यातील जनतेला अन्नदान्याची मदत करत आहेत.त्याचाच भाग म्हणून आज तालुका प्रशासनाकडे 1 टन गहू सुपुर्द केला.यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी श्री.येरेकर,प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील, माजी आमदार विलासराव जगताप,भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार,व पदाधिकारी उपस्थित होते.

जत : तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे 1 टन (1 हजार किलो) गहूची मदत देताना सभापती तम्मणगौंडा रवीपाटील, माजी आमदार विलासराव जगताप,सुनिल पवार

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here