जत,प्रतिनिधी : बागेवाडी ता.जत येथील सोमवारी दुपारच्या सुमारास सहा महिन्याचे पुरुष जातीचा मृत चिमुकला (अभ्रक) विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वैरिणी मातेबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केल्या जात आहे. तर याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.याप्रकरणी जत पोलीसात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विहिरीमध्ये आढळलेल्या या अर्भकाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,बागेवाडी ता.जत येथील तानाजी बाबूराव चौगले यांच्या विहिरीत हे पुरूष जातीचे साधारणत: सहा-सात महिन्याचे पुर्ण वाढ नसलेले अभ्रक तरंगताना दिसून आले.यांची माहिती बागेवाडी पोलीस पाटील शिवशरण यांनी जत पोलीसांना दिली.पोलीसांनी घटनास्थंळी भेट देऊन अभ्रक विहिरीबाहेर काढून पंचनामा केला.अर्भकाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.मुलगा (अभ्रक) अनैतिक सबंधातील असल्याने अडसर ठरू नये म्हणून, कोण्यातरी वैरिणी मातेने विहिरी जिवंतपणीच टाकून दिले असल़्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.पोलीस हवलदार विनायक शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.अधिक तपास अमोल चव्हाण करत आहेत.