जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील रस्ते कामातील सत्य जगजाहीर आहेच.त्यात आता हिवरे ते डोर्ली रस्त्यावरील डांबरीकरण कामाची भर पडली आहे.या रस्त्यावर डांबरीकरणाच्या कामात काळे ऑईल ओतून मातीकरण काम केल्याचा आरोप होत आहे.शासनाचा निधी हडपण्याचा उद्योग ठेकेदारी,प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून तालुक्यात सुरू आहे.यांची उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून संबधित ठेकेदार,अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी युवक नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.जत तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या ढालगाव,अंकलेला जोडणाऱ्या हिवरे ते डोर्ली या मार्गाचे अनेक दिवसानंतर
रखडलेले डांबरीकरणाचे काम जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून काम मंजूर करण्यात आले आहे.त्यासाठी भला मोठा निधी देऊ केला आहे.संबधित ठेकेदारांनी हे काम सुरू केले आहे.डांबरीकरणाच्या अगोदर कसेबसे मातीमिश्रीत मुरूम टाकून डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे.डांबर मिश्रीत खड्डीचे हे काम आईल मिश्रीत डांबराचे केल्याचे आरोप आहेत.कारण डांबरीकरण केल्यानंतर एका दिवसातच खड्डी उचकटली आहे.खड्डीकरण केलेल्या खड्डीवर डांबराचे अवषेश काळे होण्यापुरते दिसत आहेत.पूर्णत:रस्ता उखडला आहे.त्यापेक्षा वाईट स्थिती रस्त्यावरील ओढापात्रावर बांधण्यात आलेल्या सीडी वर्क बांधकामाची आहे.या सिडीवर्कच्या कामाचा दर्जा शुन्य आहे.अधिकारी व ठेकेदारांच्या संनगमताने थेट शासनाच्या निधीचा दुरुउपयोग केला गेला आहे.संपूर्ण कामाची गुणनियत्रंक विभागाकडून तपासणी करावी.बेजबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.संपूर्ण काम पुन्हा नव्याने करावे,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ढोणे यांनी केला आहे.
हिवरे ते डोर्ली रस्त्यावर उचकटलेले डांबरीकरण दर्जा स्पष्ट करत आहे.