महाराजा दत्ताजीराव शिंदे यांचा स्मृतिदिनाचे आयोजन
जत,प्रतिनिधी : श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने रणझुंजार महाराजा दत्ताजीराव शिंदे यांचा स्मृतिदिन व शिंदे शाही घराण्याचा राज्यस्तरीय स्नेहमेळावा,दि. 10 जानेवारी रोजी वाळेखिंडी(ता.जत) येथे आयोजित करण्यात आला आहे.जत तालुक्यात पहिल्यांदा मेळाव्याचा बहुमान मिळाला आहे.बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार, माजी उपसभापती शिवाजी शिंदे,जेष्ठ नेते एन. डी.शिंदे यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली.
सुरेशराव शिंदे म्हणाले,दिल्लीच्या तख्तावर एकमेव शिंदे घराण्याने भगवा फडकविला.महाराजा महादजी शिंदे व महाराजा दत्ताजीराव शिंदे यांचा गौरव व्हावा यासाठी शिंदे सरकार घराण्यातील बांधव प्रतिवर्षी भव्य स्नेहमेळावा घेतात. राज्यभरातील शिंदे बांधव त्यासाठी एकत्र येतात.यंदा हा दुर्मिळ योग जत तालुक्यात आला आहे.दि.10 जानेवारी रोजी वाळेखिंडी येथील सिध्दनाथ हायस्कूलच्या प्रांगणात हा राज्यस्तरीय स्नेहमेळावा होत आहे.मेळाव्यास राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील,राज्यमंत्री डाॅ.विश्वजित कदम , आमदार शशिकांत शिंदे, सुप्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानुगडे-पाटील उपस्थित राहणार आहेत.खा.संजयकाका पाटील,आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, आमदार शहाजी पाटील,आमदार भारत भालके,आमदार अनिल बाबर,आमदार सुमनताई पाटील,माजी आमदार सदाशिव पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख उपस्थित राहणार आहेत.